HW News Marathi
महाराष्ट्र

“…नाहीतर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असतेच”, पंकजा मुंडेंचं विधान

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीमत मुंडे यांना जागा न दिल्याने राज्यातील मुंडे समर्थ नाराज आहेत चिडले आहेत. या सगळ्या गोंधळात आज (१३ जुलै) राज्यभरातील मुंडे समर्थकांनी मुंबईत पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी समर्थकांशी बातचीत करताना पंकजा यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. डॉ. भागवत कराडांना मंत्रिपद दिल्याने नाराज नाही. त्यांच्या शपथविधीलाही गेले असते, परंतू दुर्दैवाने मला हे उशिरा समजले, यामुळे कार्यकर्तेही नाराज झाले, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

मी कुणालाही घाबरत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे राज्यभरात १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अर्थात पंकजा मुंडे यांनी आज हे सर्व राजीनामे नामंजूर केले आहेत. आज या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर दु:खी चेहऱ्याने आलात, ते माझ्या पदरात टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घेऊन माघारी जा, असे आवाहन पंकजा यांनी या कार्यकर्त्यांना केले.

मला कोणी झापले नाही

संघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. मला कोणी झापले नाही. मोदींना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली. वेळ दिला चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर राज्यातील राजकारणाबाबत पंकजा यांनी कोणाचेही नाव न घेता टोले लगावले. यासाठी त्यांनी महाभारतील उदाहरणे दिली. कौरवांसोबत रथी महारथी होते, परंतू ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत होते. मनाने ते पांडवांसोबत होते. तसेच आहे, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह आणि जे. पी. नड्डा असे सांगत पंकजा यांनी एकप्रकारे राज्यातील नेत्यांना इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी सामनातून केंद्र सरकारला सल्ला!

News Desk

“इतरांप्रमाणे आमदारांना घरे मिळत असतील तर…” – छगन भुजबळ

News Desk

“भास्कर जाधव हे नरकासुर आणि उद्धव ठाकरे देखील सोंगाड्या”, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk