HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

भाजपच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर, तर ट्विट करत ‘गोपीनाथ गड’चे दिले आमंत्रण

मुंबई। भाजपची मराठावाडा विभागीय बैठक काल (९ डिसेंबर) आयोजित केली होती. या बैठकीसाठी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. मुंडेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली. मात्र, पंकजा मुंडे या आजारी असल्यामुळे बैठकीला येऊ शकल्या नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे.

‘१२ डिसेंबर ‘ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या… वाट पहाते’ असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्यामुळे त्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वत: पंकजा मुंडे आणि आपण नाराज असल्याचे बोलून दाखवले होते. त्याचप्रमाणे जळगावात झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागातील भाजपच्या बैठकीलाही खडसेंनी उशिरा हजेरी लावली होती.

तसेच खडसेंनी विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या भेटीगाठी तेही पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर भाजपने विभागवार आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. औरंगाबादेत मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित राहिले होते.

 

Related posts

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच !

News Desk

ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-१९ चाचणी आणि उपचार सरकारी रुग्णालयातच होणार

rasika shinde

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक

News Desk