HW News Marathi
Covid-19

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंचा परळी दौरा रद्द

मुंबई | माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळी दौरा रद्द केला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी सहावा स्मृतिदिनी आहे. मात्र, यंदा कोरोना आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे गडावर होणारा कार्यक्रम आणि पंकजा मुंडेंचा परळी दौरा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी रद्द केला आहे.

येत्या बुधवारी म्हणजे ३ जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र, प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच मानवंदना देण्याचा निर्णय घेतला.

पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट

काल बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली पण #Lockdown होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. कारण मी जरी लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, त्याठिकाणी स्थानिक व इतर जिल्हयातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल, नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे #covid19 च्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा.

लोक माझं अनुकरण करतील मी घरी राहिले तर घरी थांबतील पण मी निघाले तर अश्या स्थितीत प्रश्न निर्माण होईल.

मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खा. प्रीतम ताई ह्या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन #Live करतील. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, जे मला फोन करत आहेत ताई, तुम्ही कधी निघताय, कधी निघताय.. पनवेल, नवी मुंबई, पुणे, शिक्रापूर, नगर, जामखेड, पाथर्डी, आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड सगळीकडचे लोक आम्ही निघतोय असे म्हणत आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी मी जशी आपल्याला सूचना केली आहे, त्याप्रमाणे घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया.. मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता. एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करण्यासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  

News Desk

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार

News Desk

ठरलं ! मराठा क्रांती मोर्चा येत्या ८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार

News Desk