मुंबई | दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मेळावे घेण्यात आले. मात्र, भगवान गडावर घेतलेले ऑनलाईन भाषण पंकजा मुंडेंवर भारती पडले आहे. त्यांच्यासह गर्दी झाल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावर पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी परवानगी घेऊन गेले असता गुन्हा दाखल झाले. कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची शिवतीर्थावरील परंपरा मोडत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मेळावा घेतला. आणि मोहन भागवत यांनी देखील ४०-५० सेवकांच्या उपस्थितीतीच मेळावा साजरा केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.