HW News Marathi
देश / विदेश

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

मुंबई | सरत्या वर्षात म्हणजे २०१९मध्ये भारतात एकूण ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (डब्ल्यूपीसीआय) या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या अहवालातून ही माहीती दिली आली. अहवालानुसार, २०१९ साली ३८ वाघांची शिकार करण्यात आली होती. तर २०१८ साली हा आकडा ३४ होता. दुसरीकडे मृत बिबट्यांचा आकडा २०१८ च्या तुलनेत कमी झाला असून, २०१८ मध्ये ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हे दुर्देवाने रेल्वे आणि रस्ते अपघात होते.

वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून हा आकडा २९ आहे. मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून राज्यात २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये मध्य प्रदेशात २३ तर महाराष्ट्रात १९ वाघांचा मृत्यू झाला. दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची (एनटीसीए) आकडेवारी वेगळी आहे. त्यांच्या अहवालानुसार २०१९ मध्ये ९२, तर २०१८ मध्ये १०२ वाघांचा मृत्यू झाला. एनटीसीएच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एकूण २९६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत वाढ झाली असून २०१४ मध्ये १९० वरुन हा आकडा २०१८ मध्ये ३१२ पर्यंत पोहोचला. ५२६ वाघांच्या संख्येने मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. पण शिकारीमुळे होणारे मृत्यू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांसाठी चिंतेची बाब आहे.

वाघा पाठोपाठ बिबट्यांच्या मृत्यूच्या आकड्यात २०१९मध्ये नेमकी किती घसरण झाली हे एनटीसीएकडे उपलब्ध नाही. त्याचबरोबर सोसायटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये देशभरात ५०० बिबट्यांचा तर, २०१९ मध्ये महाराष्ट्रात ९७ बिबट्यांचा मृत्यू झाला असून यामधील ३१ बिबट्यांचा रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | राज्यात आज आणखी नव्या ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडणार

News Desk

राज्यसभा खासदार आणि माजी सपा नेते अमर सिंह यांचे निधन 

News Desk