HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! परळी तालुका कोरोनामुक्त

परळी | मुंबई येथुन परळी तालुक्यातील हाळंम येथे आलेल्या दोन व्यक्तीला कोरोनाची लागण झाली.या घटनेने परळी तालुक्यात खळबळ उडाली होती.परळी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,तालुका आरोग्य प्रशासनाच्या उत्तम नियोनामुळे परळी तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे.

गेल्या 26 एप्रिल रोजी हाळंम येथे दोन कोरोनाबाधीत रुग्ण आढळुन आल्याने परळी तालुक्यातील प्रशासनाची व नागरिकांची झोप उडाली होती.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हाळंब व परिसरातील गावे कंटेन्मेट झोन जाहिर केले .आरोग्य व प्रशासकीय अधिकारी यांनी या परिसरातील गावावर लक्ष केंद्रित केले.

प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य तपासणी करुन काही जणांचा संशयीत म्हणुन स्वॕब घेण्यात आले होते.परंतु सुदैवाने ते निगेटिव्ह आल्याने परळीकरांचा जिव भांड्यात पडला.यावरुन एक गोष्ट समोर आली की त्या दोन कोरोनाग्रस्ताचा इतर कुठे पादुर्भाव झाला नाही ही बाब समोर आली आहे.

हाळंब येथील दोन कोरोनाग्रस्तांवर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.असुन त्यांच्या आरोग्या विषयी औषध उपचार व आहाराचे उत्तम नियोजन करुन चोवीस तास डॉक्टरांच्या निघराणीत आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.उपचाराअंती आज ते दोघेही कोरोनामुक्त झाल्याने आज शुक्रवारी त्यांना उपजिल्हा रुग्णालयातुन डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी स्वागत करत डिस्चार्ज देण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

News Desk

योगी आदीत्यनाथ संजय राऊतांवर का भडकले ?

News Desk