मुंबई | माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात मरीन लाईन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे.
A case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file pic), at Marine Drive Police Station. Complainant is a businessman. FIR names a total of 8 people,incl 6 Police personnel. Two civilians arrested in this matter so far: Mumbai Police pic.twitter.com/2tHMbIB7Wg
— ANI (@ANI) July 22, 2021
परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबानींच्या घरबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणात परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणात सध्या देशमुख यांची ईडी व सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र, त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अट्रॉसटि अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण मिळवलं आहे. हे सगळं सुरू असतानाच आता ते आणखी एका प्रकरणात अडकले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.