HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्या प्राथमिक चौकशीचेे गृहविभागाने दिले आदेश

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर गृहमंत्री पदाचा देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप आणि सर्वोच्च, उच्च न्यायालयात राज्य शासनास प्रतिवादी करणे ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची कृती अखिल भारतीय सेवा(वर्तणूक) नियमांचा भंग आहे का?

याबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश गृहविभागाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ही चौकशी नवनियुक्त महासंचालक संजय पांडे हे करणार आहेत. या प्रकरणात आवश्यक त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे, त्यासाठी नोटीस जारी करणे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे अधिकार गृहविभागाने पांडे यांना प्रदान केल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्राकडून मिळाली आहे.

सचिन वाझे यांचे निलंबन रद्द करत त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन सहआयुक्तांचा विरोध डावलून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष या अत्यंत संवेदनशील विभागाच्या प्रमुखपदी त्यांना म्हणजेच सचिन वाझे नियुक्त केले गेले. त्यांच्याकडे महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने त्यांना अटक केली. आधी या प्रकरणाचा तपास तेच कर्ट होते.

सिंह यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर केली का? अंबानी प्रकरणाचा तपास विधिमंडळ अधिवेशन तोंडावर असताना शासनास, वरिष्ठांना सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसा अहवाल सादर के ला गेला नाही. त्यावरून सिंह यांनी महत्त्वाच्या कामात हलगर्जी किंवा निष्काळजीपणा दाखवला का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : मुंबईची लोकल-बस सेवा बंद करणार नाही,नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा !

swarit

लवासा प्रकरणात शरद पवारांसाठी केवळ ‘त्या’ कायद्यात केली सुधारणा, याचिकाकर्त्याचा आरोप

News Desk

”अनिल देशमुखांचे PA चौकशीला सहकार्य करत नाही, सचिन वाझेला ओळखत नाही म्हणतात”, EDची माहिती

News Desk