HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंह भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यासाठी भाजपने मदत केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. परमबीर सिंह यांचं शेवटचे लोकेशन अहमदाबादमध्ये आढळले आहे. परमबीर सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये परमबीर सिंह गायब कसे झाले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु परमबीर सिंह यांचा शेवटच्या लोकेशनवरुन नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

केंद्रातील भाजप सरकारचे दबावतंत्र समोर येणार आहे

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे की, परमबीर सिंह देशात नसून देशाबाहेर गेले आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की, परमबीर सिंह यांचे शेवटचे लोकेशन हे अहमदाबादमध्ये दाखवण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे की, केंद्र सरकारचे मूळ हे अमदाबाद, गुजरातमध्ये आहे. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याचा वापर करण्यात केंद्र सरकारने केला. प्रकरण समोर येऊ नये यासाठी विदेशात पळून जाण्यामध्ये केंद्र सरकारचा हात असल्याचा आमचा आरोप असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.परमबीर सिंह यांचा वापर केला. परमबीर सिंह यांच्यापासून आता सत्य बाहेर येणार आणि त्याच्यामुळे केंद्रातील भाजप सरकारचे दबावतंत्र समोर येणार आहे. परमबीर सिंह यांचे शेवटचे लोकेशन गुजरातला असल्यामुळे भाजपनेच सिंह यांना मदत केली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राज्य सरकारला बदनाम करण्यात येत असल्याची टीका

परमबीर सिंह यांना शोधून दमले तरी सापडत नाही आहेत. अनिल देशमुखांच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. परंतु देशमुख आणि परमबीर प्रकरण वेगळं आहे. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटी रुपये जमवण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप केला होता. परमबीरांना असे देशमुखांना कधी म्हटलं नाही परंतु परमबीर सिंह तसे सांगत आहेत. आता याबाबत खुलासा देखील झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. ज्यांनी आरो केले आहेत ते पळून गेले असताना त्यांच्यावर का विश्वास ठेवला जातोय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. लोकांची दिशाभूल करुन राज्य सरकारला बदनाम करण्यात येत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

आतापर्यंत परमबीर सिंह यांना ५ समन्स पाठवण्यात आले

गृहविभागातील वरिष्ठ पोलीसअदिकाऱ्यांच्या मते परमबीर सिंह हे त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. ते चंदीदढमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना पळून जाण्यासाठी सरकारने एक प्रकारे मदत केली काय असे आता बोलले जात आहे. आतापर्यंत परमबीर सिंह यांना ५ समन्स पाठवण्यात आले असून नॉन बेलेबल वॉरंटही त्यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. तसेच लूकआऊट नोटीस त्यांना पाठवण्यात आली असून त्यांच्या मुंबई आणि चंदीगढ येथील घर बंद असल्याचे सीआयडी पथकाच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण

News Desk

तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार!,कॉंग्रेसची टीका

News Desk

नवाब मलिकांचं नवं ट्विट, ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ तर वानखेडेंचं स्पष्टीकरण

News Desk