HW News Marathi
महाराष्ट्र

“परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता”


मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत आणि त्यासोबतच मोठ्या अडचणीत आल्याचे देखील पाहायला मिळतय. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबिर सिंह यांनी आरोपांची सरबत्ती केली. आणि त्यानंतर परमबीर सिंह बेपत्ता झालेत. पुन्हा यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांच्याकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात असले तरी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची मालिका सुरु आहे. त्यानंतर सिंह यांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आल. पुन्हा त्यांच्याकडून नवा दावा करण्यात आला की देशमुख खान वरील सगळे आरोप हे ऐकीव आहेत. त्यातच आता पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याने त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईमधील निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती असा मोठा आणि गंभीर आरोप आता त्यांच्यावर करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

तर शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आता पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होता अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद

महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिलाच नव्हता, असा गंभीर आरोप आता पठाण यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागतांना दिसत आहे. पठाण आपल्या तक्रारीत म्हणतात की, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

देशमुख यांच्यासंबंधी आरोपांवर मोठा खुलासा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी ३० दिवसाची मुदत देण्यात देण्यात आली आहे. न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच परमबीर सिंहांच्या वकिलांनी चौकशी आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंबंधी आरोपांवर मोठा खुलासा केला आहे. सिंहांनी देशमुखांवर केलेल आरोप ऐकीव असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी तपास आयोगाला सांगितले.तसेच सिंहांना साक्षीदार म्हणून उभे करण्यात काही अर्थ नसल्याचं त्यांच्या वकिलाने म्हटले. सिंहांनी देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारनं एक सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीत निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल आणि वकील अभिनव चंद्रचूड सिंहांची बाजू मांडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय

swarit

धर्मा पाटील यांच्या मुलांनी १५ लाखाचे अनुदान नाकराले

News Desk

‘अजूनही चिपळूणकर मदतीच्या प्रतीक्षेत’, उदय सामंत म्हणतात मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार!

News Desk