HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार स्थापन होताना पाच अधिकारी इस्रायलमध्ये, राज्य सरकारने मागवला अहवाल

मुंबई | पेगाससचं प्रकरण सध्या सगळीकडे खूप गाजतंय आणि यामुळे राजकीय वातावरणात तणाव निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी इस्रायलला गेले होते. हे पाचही अधिकारी सोशल मीडियाचं प्रशिक्षण घ्यायला गेले होते. विशेष म्हणजे कुणाचीही परवानगी न घेता हे अधिकारी इस्रायलाल गेले असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा पेगाससशी काही संबंध आहे का? असा सवाल केला जात असून त्याच्या सखोल चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकार घडत असताना फोन टॅप झाले

पेगासस प्रकरणात अनेक राजकारण्यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीही या पेगागसद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोनही टॅप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार बनवत असताना सरकार बनविण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्वांचे फोन टॅप केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांचे हे आरोप ताजे असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक नवा खुलास करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

सावंत काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक मागणी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? याच्या चौकशीची सचिन सावंत यांनी मागणी केली आहे. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

 

पेगासस काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अ‍ॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk

जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ‘कोरोना रुग्णालया’त रुपांतर !

News Desk