HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या पेन्शन योजनेविरोधात ठाणे ते मुंबई निघणार पेन्शन दिंडी

मुंबई | नव्या पेन्शन योजनेला विरोध करत राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. ‘रन फॉर पेन्शन’ची हाक देत या आंदोलनाने आता वणव्याचे रूप धारण केले आहे. कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनात सामील होत असताना प्रवीण बहादे या कर्मचाऱ्याने थेट यवतमाळ ते ठाणे हे तब्बल ७००किमीचे अंतर सायकरवरून पार करण्यास सुरूवात केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीणला हिशोबावेळी या योजनेतील फसवेपणा दिसला. योजनेला विरोध करताना त्याने योजना सोडत असल्याचा राजीनामाही दिला.

जुन्या पेन्शनसाठी संघटना निर्माण झाली असून या संघटनेने मोर्चाची हाक दिल्याचे कळताच, तोही या आंदोलनात सामील होण्यासाठी निघाला आहे. वरिष्ठांच्या कारवाईला न घाबरता प्रवीणने १८ सप्टेंबर २०१८ रोजी यवतमाळहून जुन्या पेन्शन लढ्याची मशाल घाती घेतली आहे. यवतमाळहून दारव्हा, कारंजा, मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा, जालना, औरंगाबाद, कोपरगाव, सिन्नर, इगतपुरी, शहापूर असा प्रवास करत तो १ ऑक्टोबर २०१८ रोजी ठाणे येथून निघणाऱ्या पेन्शन दिंडीमध्ये सामील होणार आहे.

प्रवीणच्या या मशालीमुळे राज्यभरात वणवा पेटला आहे. आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन दिंडीत सामील होण्याचा निर्धार संघटनेकडे व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईवर लाखो शासकीय कर्मचारी पेन्शन दिंडी घेऊन धडकतील. तेव्हा या ‘वन मॅन आर्मी’च्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत हा वणवा शमणार नसल्याचे प्रवीणने माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत सरकार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करणार, शरद पवार यांनी या निर्णयाचे केले स्वागत…

News Desk

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ‘त्या’ फाईलमधील मजकुरात परस्पर बदल ?

News Desk

अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा! – मंगलप्रभात लोढा

Aprna
मनोरंजन

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

News Desk

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर मोदींची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळतो. मात्र, वाहिनीने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार देत कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने केला आहे.

द वायर या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने हे आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा नव्याने चित्रीकरणासाठी बोलावले. मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही असे मला वाहिनीकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्पर्धकांना आॅडिशन द्यावी लागते. पण, नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्याम रंगीलाचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला थेट कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले गेले.

Related posts

महिला दिन आणि विचार करायला लावणारे प्रश्न…!

News Desk

तनुश्री दत्ताला नानांनी बजावली कायदेशीर नोटीस

News Desk

माझ्या आठवणीतली दिवाळी | Rutuja Bagwe

News Desk