HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

चाकरमान्यांसाठी खूशखबर ! गणेशोत्सवासाठी काही अटींसह एसटीने कोकणात जाता येणार 

मुंबई | दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी चाकरमानी मोठे उत्सुक असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी जाण्याच्या व्यवस्थेबाबत अनेक चाकरमानी संभ्रमात होते. याच पार्श्वभूमीवर, आज (२० जुलै) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्यांना काही अटी-शर्थींसह यंदा गणेशोत्सवाकरिता एसटीने कोकणात प्रवास करता येणार आहे.”

“चाकरमान्यांच्या कोकणात जाण्याच्या मुद्द्यावरून कोणतेही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणच्या चाकरमान्यांना यंदाही कोकणात सुखरुप पाठविण्यात आणि त्याचप्रमाणे आणण्यात येईल” असा विश्वास अनिल परब यांनी दिला आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या कोकणातल्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

“आम्ही याकरिता आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचनाही मागवल्या आहेत. कोकणात साधेपणाने गणेशोत्सव कसा साजरा करता येईल ? कोरोना संसर्ग नियंत्रणात कसा ठेवता येईल, याचा विचार करुनच मुख्यमंत्री निर्णय घेतील. कोकणात ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांना जाऊन ती उघडावी लागतील अशा लोकांसाठी अटी-शर्थींसह ही एसटीची सेवा असेल, असे अनिल परब म्हणाले.

Related posts

बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही – नारायण राणे

News Desk

आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही !

News Desk

आधीच्या सरकारने बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत !

News Desk