HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे

balasaheb thorat

मुंबई | महाराष्ट्रात लॉकडाऊन जरी केला असला तरी अत्यावश्यक सेवा सुरुच आहेत. भाजीपाला, औषधे, दुध या सगळ्यांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. परंतु, त्यांनीही पुरेशी काळजी घेणे, स्वच्छता राखण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान, जनतेला जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळमार असून प्रसासन युद्ध पातळीवर काम करत आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी म्हटले आहे. तसेच, लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये कोणतेही निर्बंध नसल्याचेही त्यांनी यावेळा सांगितले. दरम्यान, गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टींग मशीन आणले आहेत आणि त्यांना लागणाऱ्या इंधनाचीही पुरेशी सोय केली आहे. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा आशयाच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धताही केली जाते आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र, काही दिवसांपासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नाही. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, अशी घोषणाही केली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.

Related posts

राज्यात ५,९६५ नवे रुग्ण आढळले

News Desk

प्लास्टिक बंदीमुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

धनंजय दळवी

साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk