HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल!

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताच आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. देशमुखांचे माजी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.

अनिल देशमुख यांची भूमिका

न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. “माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे देशमुख म्हणाले आहेत.

ईडीच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार

पालांडे आणि शिंदे सुरुवातीला ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांना अटक करून आता 60 दिवस होत आहेत. ईडीच्या कायद्यानुसार 60 दिवसात आरोपपत्र दाखल करायचं असतं. त्यानुसार पालांडे आणि शिंदे यांना अटक करुन आज 60 दिवस होत आहेत. यामुळे ईडीच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

“ठाकरे सरकारने आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”, भाजपची सरकारला मागणी

News Desk

तिथे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इथे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

News Desk