HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त, दुष्काळ निधी मात्र कायम

मुंबई केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदभार्तील घोषणा केली. त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी होतील. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल.

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २५ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २६ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे ११ रुपयांचा अधिभार आकारला जातो. डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २१ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २२ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला १९ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. मात्र, आता व्हॅट कमी केल्याने सरकारला २८०० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. २०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमती त्यातुलनेत कमी होऊनदेखील पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर या दरानेच मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे पेट्रोल- डिझेलचे दर कमी होत नव्हते. यामुळे केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू होती. विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जनतेच्या या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने गेल्या मंगळवारीच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

News Desk

राम शिंदेंच्या चौंडी गावात रोहित पवारांच्या पॅनलने मारली  बाजी

News Desk