HW News Marathi
महाराष्ट्र

डोंबिवलीत प्रदुषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याचे मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

मुंबई | डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे स्थानिकांचे जगणे कठीण झाले आहे. गेल्या काही वर्षांत डोंबिवलीत हिरवा पाऊस, लाल पाणी, गणेशमूर्ती काळवंडण्याचे प्रकार प्रदूषणाबाबातील समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या डोंबिवलीत एक रस्ता रासायनिक प्रदूषणामुळे चक्क गुलाबी झाल्याचे समोर आले आणि मोठी खळबळ उडाली. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये हा प्रकार समोर आला. यासंदर्भात नेकदा एमआयडीसी आणि एमपीसीबीकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या तरी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळली आहे.

डोंबिवलीकर प्रदुषणाच्या होणाऱ्या त्रासाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (५ फेब्रुवारी) कॅबिनेट बैठकीत केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने माहिती घेत अहवाल सादर करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आजच्या डोंबिवलीतील प्रदुषण प्रकरणातील अहवाल देण्याचे व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. एमआयडीसी मधील रस्त्यांवर केमिकल परसल्याने ते गुलाबी रंगाचे झाले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना याचा त्रास होत असून डोळे चुरचुरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांनी या प्रकरणी पर्यावरण विभागकडे बोट दाखवले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीत शेकडो कार्यकर्त्यांची घरवापासी सूरू!

News Desk

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः अशोक चव्हाण

swarit

दिवाळीनंतर शाळा सुरु करणे अशक्य,बच्चू कडूंचा इशारा!

News Desk