नवी दिल्ली | देशभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी आज जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यानुसार आज (२२ मार्च) सकाळी ७ वाजल्यापासून वाजेपर्यंत देशभरात जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू थोड्यात वेळात संपण्यापूर्वी मोदींनी ट्वीट करत जनतेला पुन्हा एक नवे आवाहन दिले आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले की, जनता कर्फ्यू आज रात्री ९ वाजता समाप्त होणार आहे. मात्र, याचा अर्थ असा होत नाही. आपण जल्लोष करायला सुरुवात केली पाहिजे. हे यश न मानता, एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे. आज देशवासियांनी दाखवून दिले की, आपण सक्षम आहोत, आपण दुढ निश्चय केला तर सर्वात मोठ्या संकटला देखील हरवू शकतो.”
आज का #JantaCurfew भले ही रात 9 बजे खत्म हो जाएगा, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि हम सेलिब्रेशन शुरू कर दें। इसको सफलता न मानें। यह एक लम्बी लड़ाई की शुरुआत है। आज देशवासियों ने बता दिया कि हम सक्षम हैं, निर्णय कर लें तो बड़ी से बड़ी चुनौती को एक होकर हरा सकते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
मोदी म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे जनतेने पालन करावे. ज्या राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या राज्यातील जनतेने घरातून बाहेर पडू नका, तर देशातील इतर राज्यात गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसच्या लढाईत सहभागी होणाऱ्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे धन्यवाद करत, सर्वांचे आभार मानतो, असे ट्वीट करत मोदींनी आजच्या जनता कर्फ्यूला दिलेल्या उत्तम प्रतिसादबद्दल धन्यवाद करत आभार व्यक्त केले.
केंद्र सरकार और राज्य सरकारों द्वारा जारी किए जा रहे निर्देशों का जरूर पालन करें। जिन जिलों और राज्यों में Lockdown की घोषणा हुई है, वहां घरों से बिल्कुल बाहर न निकलें। इसके अलावा बाकी हिस्सों में भी जब तक बहुत जरूरी न हो, तब तक घरों से बाहर न निकलें। #JantaCurfew
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
महाराष्ट्रात आजमध्य रात्रीपासून १४४ लागू
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. यादरम्यान, रेल्वे , खाजगी आणि एस. टी. बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.