HW News Marathi
देश / विदेश

मोदींना नटसम्राट बनायचं असेल तर सिनेमात जावं ! नाना पटोलेंची घणाघाती टीका 

मुंबई | “नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं. राज्यसभेत नरेंद्र मोदींची नौटंकी आपण पाहिली”, असे म्हणत काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी राज्यसभेत सर्वांसमोर सांगताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (९ फेब्रुवारी) गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना संसदेतून निरोप देताना पंतप्रधान मोदी भरभरून बोलले. गुलाम नबी आझाद यांच्याबाबत बोलताना यावेळी भर राज्यसभेत पंतप्रधानांचा आवाज जड झाला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ही टीका केली आहे.

पंतप्रधान राज्यसभेत भावून झाले त्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांची तुलना ‘नटसम्राट’सोबत केली तर काही चुकीचं ठरणार नाही. मोदींना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं. राज्यसभेत नरेंद्र मोदींची नौटंकी आपण पाहिली. त्यावेळी जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसले नाहीत का?

नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले कि, “दिल्लीत गेल्या ७७ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसले नाहीत का? नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे आहेत. नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

विमानात पेटला लॅपटॉप

News Desk