HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींची ‘ऑक्सिजन वॉरियर्स’सोबत ‘मन की बात’

नवी दिल्ली | देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून, दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनमुळे प्रचंड हाहाकार उडाला होता. देशात सगळीकडे कोरोनाची अवस्था चिंताजनक झाल्याने सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असून, यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्याचबरोबर देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे.

‘मन की बात’मधून साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशात मागच्या काही दिवसांत येऊन गेल्या चक्रीवादळांबद्दलही भाष्य केलं. “अलिकडेच १० दहा दिवसांपूर्वी देशाने दोन चक्रीवादळांना तोंड दिलं. पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रीवादळ धडकलं, तर पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाने तडाखा दिला”.

“देश आणि देशातील जनता पूर्ण ताकदीने या चक्रीवादळाशी लढली आणि त्यात कमीत कमी जीवितहानी होईल याची खबरदारी घेतली. पूर्वीच्या तुलने आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येणं शक्य झाल्याचंही दिसत आहे. या चक्रीवादळा प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,” असं मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध भागात पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनबद्दलही चर्चा केली. पंतप्रधानांनी रेल्वे, जहाज आणि विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबतही संवाद साधला. ते करत असलेल्या देशसेवेबद्दल मोदींनी आदर व्यक्त केला. त्याचबरोबर मोदी यांनी कृषी क्षेत्रानं देशाच्या विकास बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची नोंद घेतली.

“देशभरात ऑक्सिजन टँकर घेऊन जाणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत संवाद करण्याचं आवाहन मला अनेकांनी नमो अॅपवर केलं. जेव्हा करोनाची दुसरी लाट आली, तेव्हा ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. खूप मोठं आव्हान होतं. देशाच्या विविध भागात मेडिकल ऑक्सिजन पोहोचवण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. ऑक्सिजन टँकर घेऊन जाताना छोटीशी चूक झाली, तर खूप मोठा स्फोट होण्याचा धोका असतो”.

“ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट देशाच्या पूर्वेकडील भागात आहेत. तिथून दुसरीकडे ऑक्सिजन पुरवायचा होता. देशासमोर निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत मदत केली, ती ऑक्सिजन टँकर चालवणाऱ्या टँकरचालकांनी, एक्स्प्रेस ट्रेन आणि हवाई मालवाहतूक करणाऱ्या हवाई दलाच्या जवानांनी,” असं म्हणत मोदींनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली

News Desk

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”- रामदास आठवले

News Desk

वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू तर १४ जखमी

Aprna