नवी दिल्ली । देशातील कोरोनास्थिती अत्यंत भीषण आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी आज (२२एप्रिल) निर्णय जाहीर केला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकरिता शुक्रवारी (२३ एप्रिल) आयोजित आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर शुक्रवारी सकाळी एक हायलेव्हल बैठक होणार असून मोदी या बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः याबाबतचे ट्विट केले आहे.
Tomorrow, will be chairing high-level meetings to review the prevailing COVID-19 situation. Due to that, I would not be going to West Bengal.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021
पंतप्रधान मोदींनी जरी आपल्या सभा रद्द केल्या असल्या तरीही पश्चिम बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता व्हर्च्यूअल सभांमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान मोदी शुक्रवारी १० वाजता देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. तर दुपारी १२.३० वाजता मोदी देशातील मोठ्या ऑक्सीजन निर्मात्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील.
पंतप्रधान मोदी यांच्या शुक्रवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी बंगालमध्ये ४ सभा घेणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) या ४ ठिकाणी आयोजित सभा मात्र आता रद्द करण्यात आल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.