HW News Marathi
Covid-19

“राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार?”, मोदींचा राज्यांना सवाल

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना लसीकरणावरुन मोदींनी विरोधकांना आणि या आधीच्या कॉंग्रेस सरकारला नाव न घेता टोला लगावला आहे.

‘राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार’

केंद्र सरकारचं सर्व का करतंय, राज्यांना अधिकार का नाहीत असं विचारण्यात आलं, आमच्यावर प्रश्न विचारण्यात आले, राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार, असंही विचारलं. मात्र केंद्राने एक गाईडलाईन बनवून राज्यांना नियमावली दिली. देशातील नागरिक नियम पाळत आहेत. लसीकरण नीट सुरु झालं. अशावेळी काही राज्यांनी लसीकरणाबाबत प्रश्न विचारले, वयोगट का, विकेंद्रीकरण का नाही, ज्येष्ठांनाच का पहिले लस, देशातील काही मीडियाने याबाबत कॅम्पेन केलं, मात्र अनेक चर्चेनंतर राज्यांच्या आग्रहास्ताव 16 जानेवारीपासून नियम बदल करण्यात आला. 25 टक्के काम राज्यांवर सोपवण्यात आलं.

1 मे पासून राज्यांना 25 टक्के काम सोपवण्यात आलं, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.

फ्रंटलाईन वर्करना लस दिली नसती तर काय झालं असतं?

लसीला काही मर्यादाही आहेत, जगभरात लसीकरण सुरु आहे, समृद्ध देशांनी सर्वात आधी सुरु केलं, वैज्ञानिकांनी लसीकरणाची रुपरेषा आखली, भारतानेही WHO च्या मानकानुसार व्हॅक्सीनेशन सुरु करण्याचा निर्धार केला. केंद्राने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन, खासदारांच्या सूचना ऐकून ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका होता, त्यांना आधी लस दिली. यामध्ये हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त या सर्वांना सर्वात आधी लस देण्यात आली. फ्रंटलाईन वर्करना लस दिली नसती तर काय झालं असतं? आरोग्य कर्मचारी, ड्रायव्हर्स, सफाई कर्मचारी यांना लस दिली नसती तर परिस्थिती बिकट झाली असती. त्यांना लस दिल्यामुळे ते इतरांच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांनी अनेकांचे जीव वाचवले.

नेझल व्हॅक्सिनवर ट्रायल

देशात 7 कंपन्या लसनिर्मिती करत आहेत, 3 आणखी लसींची ट्रायल सुरु आहे. लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी अन्य कंपन्यांशी संपर्क सुरु आहे. देशात एका नेझल व्हॅक्सिनवर ट्रायल सुरु आहे. नाकात स्प्रे करुन ही लस दिली जाऊ शकते. या लसीवर जर यश मिळालं, तर भारताच्या लसीकरण मोहिमेला आणखी यश मिळेल.

पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

– आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची

– केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार

– केंद्राच्या नियोजनानुसार लसीकरण सुरु

– १८ वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण, केंद्र लस मोफत देणार

– १ मेपासून लसीकरणाचं २५ टक्के काम राज्यांवर सोपवलं

– राज्यांजवळील २५ टक्के कामंही केंद्र करणार

– जानेवारी ते एप्रिलपर्यंत राज्यांना लसी पोहोचवल्या

– २१ जूनपासून १८ वर्षांवरील नारगिकांचं लसीकरण

-भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर

-परदेशातून लस भारतात आणण्यावर भर

– कोरोना लसींचा पुरवठा वाढणार

– देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण

-परदेशी कंपन्यांसोबत करार केले

– जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला.

– देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान

– देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या

– कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली

– कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं

– एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती

– देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण

– जगात भारत लसीकरणात मागे नाही

– कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा

– ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली

– मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात आजपासून काय सुरु का बंद? जाणून घ्या…

News Desk

केंद्राच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार, १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली !

News Desk

पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पहिली बस आज अहमदनगरला रवाना

News Desk