HW News Marathi
Covid-19

भारतात लसींची निर्मिती हे ऐतिहासिक काम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. इतिहास पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा केला गेला. यासाठी नौसेना आणि हवाई दलाचीही मदत घेतली. इतकंच नाही तर कोरोना काळात मोठ्या प्रमाणाच औषध निर्मिती केल्याचंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

– देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान

– देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या

– कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली

– कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं

-एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती

– देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण

– जगात भारत लसीकरणात मागे नाही

– कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा

– ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली

– मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण, राज्यपाल विलगीकरणामध्ये…

News Desk

WHO कडून आपत्कालीन लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही, लस घेतलेल्या भारतीयांच्या प्रवासाला ब्रेक?

News Desk

अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk