मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या मुलूंड निवासस्थानाबाहेर पोलीसांचा बंदोबस्त आहे. पोलीसांनी त्यांना घरातून बाहेर जाऊ नका अशी विनंती केली होती. तरीही ते बाहेर पडल्याकारणाने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सोमय्या यांनी त्यांना अटक झाल्याची बातमी स्वत ट्विटरवर पोस्ट केली होती.
Police has arrested me from my residential premises/Office from NilamNagar Mulund, and now taken to Mulund East navghar police station
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 8, 2020
दरम्यान, घरातून बाहेर जाण्याचे कारणही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून ज्या अभियंताला मारहाण करण्यात आली त्या अनंत करमुसे ला ११ वाजता त्यांना भेटायला जायचे होते. त्यासाठीच ते घरातुन बाहेर पडले असता पोलीसांनी त्यांना अटक केल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले. पोलीसांनी त्यांना निलम नगर या त्यांच्या निवासस्थानातून अटक केली असून त्यांना नवघर पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत.
It's pity that Mumbai Police has detained Me at my residential premises ( NilamNagar Mulund) and stopped me from going to the residence of Anant Karmuse, whom Jitendra Awhad men has beaten yesterday, I am supposed to meet Anant Karmuse today at 11am today @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.