मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अशोक याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी उमेश जाधव या आरोपीला ९ जुलैला अटक करण्यात आली होती.
Maharashtra: Police arrested Vishal Ashok, the main accused in the incident where premises of Dr BR Ambedkar's house 'Rajgruha' in Mumbai was vandalised by unidentified persons on 7th July. Another accused Umesh Jadhav was arrested on 9th July.
— ANI (@ANI) July 22, 2020
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर ८ जुलैला दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली होती. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली होती. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले होते.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.