HW News Marathi
Covid-19

जादा पैसे आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहेच तर दुसरीकडे मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत आहे. अशातच गेले काही दिवस कोविड-१९ ची रुग्णालये रुग्णांवर उपचार करताना जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे आणि मुंबई पोलिसांकडे देखील येत होत्याच. आणि आता मुंबईच्या नानावटी रुग्णालयावर मुंबई महापालिकेने जास्त पैसे घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नानावटी रुग्णालयावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईच्या नानावटी रुग्णालयाविरोधात महानगरपालिकेने सांताक्रूझ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंदवला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमावलीला धुडकावून कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्याकरता जास्त बिल घेतल्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नानावटी विश्वस्त मंडळावर गुन्हा नोंदवण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

एका मृत कोविड-१९ रुग्णाचे बिल ६ लाख ८५ हजार केले आणि बिल भरल्याशिवाय संबंधित रुग्णाचा मृतदेह दिला जात नव्हता, अशी तक्रार आल्यानंतर या केसच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना विरोधातील युद्धात आम्ही आमचा एक कर्मचारी गमावला आहे. सोबतचं रुग्णालयाचे सीईओना देखील कोरोनाची लागल झाली आहे. आमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, आम्हाला याची अद्याप कॉपी मिळाली नाही. आम्ही प्रशासनाला यात संपूर्ण सहकार्य करू, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

“हो मी धावता कोकण दौरा केला पण…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk