HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे | भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात ५ लाखांच्या खंडणी प्रकरणी महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील कोथरुढ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठी विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण करुन त्यांना चाकूचा धाक दाखवून राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर ५ लाखांच्या खंडणीप्रकरणी महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

या फिर्यादीत अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी असे म्हटले होते की, ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना पुण्यात संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली होती. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेण्यात आले होते.

त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी या ठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती.

हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी आ. गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २८ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. यानंतर आता कोथरूड स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने कायदे मंजुर करताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, पवारांचा सल्ला   

News Desk

नितेशच्या वागण्याला माझे समर्थन नाही !

Atul Chavan

परळीत धनंजय मुंडे गटाने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले

News Desk