HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राजकीय नेत्यांनी जनतेला दिला सोशल मीडियावरुन धीर

मुंबई | संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान मोदींनी आज घोषित केलेल्या जनता कर्फ्यूचे पालन देशभरातून सगळे नागरिक काटकेरपणे करत आहेत. मुंबईची ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनचा प्रवास हा आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच ओळखपत्र तपासून ट्रेंनमध्ये प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, जनतेने घाबरुन न जाता घरातच बसावे आणि सरकार ज्या सुचना देत आहेत त्यांचे पालन करावे असे आवाहन अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे नागरिकांना केले आहे. गेली अनेक दिवस कोरोनाच्या दिवसेंदिवस परिस्थितीवर जे काटेकोरपणे लक्ष देत आहेत असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूचे पालन करुयात, घरातच बसूयोत असे ट्विट केले आहेच शिवाय त्यांनी व्हिडिओद्वारेही लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक न्याय व विकासमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील कोरोनास्वरुपी संकटाचा संयमाने आणि धीराने सामना करावा असे आवाहन जनतेला केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेला घरी थांबण्याची विनंती केली आहे.

कर्फ्यूमुळे लोकं घरातून बाहेरच पडत नसल्याकारणाने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी काही गायकांच्या लिंक ट्विटरवरुन जनतेसाठी ट्विट केल्या आहेत.

Related posts

तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

News Desk

दलित महिला बलात्कार प्रकरणी नुसत्याच भेटी

News Desk

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk