HW News Marathi
देश / विदेश

बीडमध्ये मुंडे बहीण-भावात पुन्हा लागली श्रेय वादावर चढाओढ

बीड । राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावात या ना त्या कारणावरून शाब्दिक चकमकी होत असतात. मात्र विशेषतः कामाच्या श्रेय वादावरून देखील मुंडे बहीण भाऊ नेहमीच चर्चेत असतात. त्याचेच एक ताजे उदाहरण घ्यायाचेच झाले तर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी परळी- गंगाखेड रस्त्याच्या कामासाठी नुकतीच दिलेली मंजुरी होय.

नितीन गडकरी यांनी या कामासाठी तब्बल 224 कोटी एवढा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे तसेच बीड शहरातील मुख्य रस्ता व अन्य अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 75 व 18 एकूण 93 कोटी रुपयांची मजुरी देण्यात आली. याच कामाच्या श्रेयावरून आता पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याच जुंपली आहे.

या कामाच्या श्रेयासाठी एकीकडे पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे की हे काम मंजूर करून मी आणले आहे. तर दुसरीकडे हेच काम विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे म्हटले जात आहे. बीड जिल्ह्यात कोणतेही विकास कामे होत असतील तर याचे श्रेय मात्र हे दोघे मुंडे बहीण भाऊ घेतांना दिसून येतात हे ही तितकेच खरे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk

एएन-३२ विमानातील १३ जवान शहीद

News Desk

जागतिक महिला दिना निमित्ताने मोदीना कुंवर बाई यांचे स्मरण

swarit