HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, वोटिंग मशीनमध्ये बिघाड

पालघर | महाराष्ट्रात आज दोन ठिकाणी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये पालघर व भंडारा- गोंदीयाचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणच्या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच काही मतदान केंद्रांवर गोंधळाची परीस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. आज मतदान झाल्यानंतर ३१ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

परंतु पालघरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे. १२ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मशीन बंद होत्या त्यामुळे लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्यामुळे मतदान न करताच अनेक लोक परत गेल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

  • पालघरमध्ये या ठिकाणी झाला मशीनमध्ये बिघाड
  1. तारापूर
  2. शेलवाली
  3. कमारे
  4. सातपाटी
  5. मायखोप
  6. धुकटण
  7. चिंचण
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री धनंजय मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, शरद पवारांकडून हीच नैतिकता अपेक्षित ! | चंद्रकांत पाटील

News Desk

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मोठया प्रमाणात राबवा – मुख्यमंत्री

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झोपुच्या ‘आसरा अ‍ॅप‘चा शुभारंभ

Gauri Tilekar