HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीच्या रणजित बागलचा पोस्टरद्वारे सवाल!

मुंबई | केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत २ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या मुद्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट केले होते. यावरुन सचिनच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी केली आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून स्वाभिमानीच्या रणजित बागल याने उपस्थित केला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता.

पोस्टरवर काय लिहिले आहे?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे.

सचिन तेंडुलकरने काय ट्विट केले होते?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं ट्विट द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं. भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

 

Related posts

पीएम केअर्स फंडविरोधात दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर गुन्हा दाखल

News Desk

पक्षातून बाहेर पडलो अन् माझ्या नावाचा जपच सुरु झाला !

News Desk

राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यानंतर शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुन्हा भेट!

News Desk