HW News Marathi
महाराष्ट्र

“बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे”

ठाणे | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांना काल(२४ ऑगस्ट) जमीनही देण्यात आला आहे. यासर्व घडामोडीं दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. आज ठाण्यात याचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत.

ठाण्यात पोस्टरबाजी सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलल्यावर आता नारायण राणे यांच्या विरोधात ठाण्यात पोस्टरबाजीला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत असून यात ”बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे…आज, उद्या, कधीही…मा. उद्धवजींसोबतच.”, असा आशय छापण्यात आला आहे. पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावं आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत.

४ अटींवर जमीन मंजूर

नारायण राणे यांना कोर्टाने तीन अटींवर जमीन केला आहे.

– राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

– त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे.

– राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल

– 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे पक्षावर नाराज?

News Desk

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं १००व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा!

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि शरद पवारांच्या उपस्थित’ मुंबईकरांचे स्वप्न होणार पूर्ण!

News Desk