HW News Marathi
देश / विदेश

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

हाथरस | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (११ ऑक्टोबर) हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणे सोपे होणार आहे.

हाथरमधील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये. रात्रीतूनच मृतदेह जाळला, तर कुणावर विश्वास ठेवावा? येथील प्रशासनाने धमकावण्याचे काम केले आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

काल हाथरसच्या आमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो होतो. योगी सरकारने काल सकाळी यांना लखनऊ येथे नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कुणीही नेण्यासाठी आलेले नाही. सरकारने अधिक संवेदनशील होणे आवश्यक आहे. आम्ही आणि देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी आपल्या या कुटुंबासोबत आहोत. हाच विश्वास देऊन जात आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

‘हे स्पष्ट आहे, की स्थानिक शासन-प्रशासनाने आपली विश्वसनीयता पूर्णपणे गमावली आहे. यामुळेच कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त अथवा सिटिंग न्यायाधिशांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. जी अगदी उचित आहे. कुटुंबाच्यावतीने आपल्या सर्व पक्षांना ही मागणी करावी लागेल,” असेही आंबेडकरांनी म्हटले.

 

https://www.facebook.com/103497624327181/posts/356607249016216/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशातील ‘उलट्या वराती’त नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेले बरे!

swarit

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत १ दहशतवादी ठार

News Desk

आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, पण आता…!

News Desk