HW News Marathi
महाराष्ट्र

मंदिर पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करणार – प्रकाश आंबेडकर

पंढरपुर | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (३१ ऑगस्ट) राज्य सरकारने मंदिरे पुन्हा सुरु करावी यासाठी आंदोलन केले होते. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार लवकरच राज्यातील मंदिरे सुरु करतील अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर, मशीद, बुद्धविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठीची नियमावली राज्य सरकार तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
पुढील ८-१० दिवसांत ही नियमावली तयार होईल आणि मंदिरे सुरु होतील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारने आश्वासन पाळले नाही तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ, याची नोंद सरकारने घ्यावी, असेही आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे मंदिरे पुन्हा सुरु होणार का आणि नियमावली काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

https://www.facebook.com/225953357432863/posts/3722582691103228/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील! – मुख्यमंत्री

Aprna

…मग उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार!

News Desk

‘वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर नाही तर,’ सिल्व्हर ओकवर भाजपचा आरोप!

News Desk