HW News Marathi
महाराष्ट्र

एक राजा तर बिनडोक, दुसऱ्या राजाची आरक्षणाची भूमिका बरोबर – प्रकाश आंबेडकर

पुणे | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मोठे वक्तव्य देखील केले आहे. छत्रपती उदयनराजे यांचे नाव न घेता टाळत “एक राजा बिनडोक आहे,” असे आंबेडकर म्हणाले आहेत.

“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजीराजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचं मला दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपनं राज्यसभेवर कसे पाठवले? याचंच मला आश्चर्य वाटतं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम निर्णय जाहीर करू !

News Desk

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

Manasi Devkar