HW News Marathi
महाराष्ट्र

…असं केलं तर ठाकरेचं काय, मोदीही तुमच्या दारात येतील, मोदींच्या भावाचा सल्ला

उल्हासनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सख्खे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही’, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला आहे.

उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य न होईलपर्यंत जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी आंदोलन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

“मागण्या पूर्ण न होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, असं आंदोलन करा. तुम्ही असं केलं, तर उद्धव ठाकरेच काय; नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कुणी. आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही”, असं प्रल्हाद मोदी व्यापाऱ्यांना म्हणाले. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमभंग केल्याप्रकरणात हे गुन्हे दाखल केलेले असून, यासंदर्भातील तक्रारी व्यापाऱ्यांनी मोदी यांच्याकडे मांडल्या. याचबरोबर इतरही मुद्दे त्यांनी प्रल्हाद मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.

चहावाले आम्ही नाही तर आमचे वडील

प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.

ज्याचा मुकुट मोठा पत्रकार त्यालाच चालवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, असं म्हणत खुद्द नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटे काढले. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, अशी फटकेबाजी प्रल्हाद मोदी यांनी केली..

प्रल्हाद मोदी यांचा चिमटा नेमका कुणाला?

आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. त्यामुळे प्रल्हाद मोदींनी चिमटा नेमका पत्रकारांना घेतला, की स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच घेतला? अशी कुजबुज सभागृहात रंगली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात १६ नोव्हेंबरपासून ‘मराठा संवाद यात्रा’

Gauri Tilekar

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk

खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले – बाळासाहेब थोरात 

News Desk