HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीने का कारवाई केली? मला माहिती नाही, ईडीच्या धाडीनंतर प्रताप सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज ईडीने छापा टाकत कारवाई केली. त्यांच्या ठाण्याच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली. त्यानंतर तब्बल ९ तासांनर प्रताप सरनाईक मुंबईत दाखल झाले आहेत. जेव्हा ईडीची धाड पडली तेव्हा सरनाईक देशाबाहेर होते. ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर नऊ तासाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने आज छापे मारले. त्यानंतर सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रताप सरनाईक घरी नव्हते. ते परदेशात असल्याचं बोललं जात होतं. यावेळी प्रताप सरनाईक यांनी हे काय प्रकरण आहे? काय आहे? ईडीने आम्हाला कशाला बोलावलं? हे मला माहीत नाही, असं सरनाईक यांनी सांगितलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सरनाईकांनी आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची सामाना कार्यालयात जाऊन भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk

अमित शहांच्या कौशल्याची आम्हीही आतुरतेने वाट बघतोय !

News Desk

पवार – फडणवीसांच्या भेटीत रहस्य वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाही! – सामना

News Desk