HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार – प्रताप सरनाईक

मुंबई | शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक काल (४ सप्टेंबर) कंगना राणावत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील असे वक्तव्य केले होते. यावरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर केले आहे. ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’ असल्याचं ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलं आहे ते पाहू. “मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.”

 

कंगनाच्या कोणत्याही ट्विटमध्ये असं कुठेचं वाटलं नाही, की ती देशद्रोही आहे किवा तीने कोणत्याही व्यक्तीला धमकावलं आहे असं मतं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्यांची ‘महिलांनी तोंड बंद ठेवाव’ ही विचारधारा समोर येते. राष्ट्रीय महिला आयोगाने ही भूमिका कंगना अभिनेत्री आहे म्हणून घेतलेली नाही. उद्या जर कोणालाही अशी धमकी आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची हीच भूमिका घेईल, असं रेखा शर्मा म्हणाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Aprna

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

News Desk

#CoronaVarrus : राज्यातील पहिल्या ‘कोरोना’बाधित दाम्पत्यांना आज मिळणार डिस्चार्ज

swarit