HW News Marathi
Covid-19

Pravin Darekar HW Exclusive | उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवर भाजप आडकाठी करत नाही !

मुंबई | महाराष्ट्र कोरोनाचा संसर्ग वेगान वाढत आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात दुसऱ्या बाजुला महत्त्वाच मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरुन राजकारण चांगलेच तापला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या सर्वमुद्द्यावर विधान परिषेदेच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत सखोल चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्तीमध्ये अडथळा यावा. यासाठी भाजप कोणत्याही प्रकारची कृती करताना दिसणार नाही, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवणी दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

दरम्यान, विधानसभेचे विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राजकीय भावनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले असेल तर यांचा कोणी वेगळा अर्थ लावणे योग्य ठरणार नाही, असे देरकरांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले. फडणवीस हे राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भावर चर्चा आणि सूचना करण्यासाठी ते राज्यपालांना भेटल्या असेल. तर फडणवीस आणि राज्यपालांची भेटही मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेच्या नियुक्ती संदर्भात झाल्याचा अर्थ लावून चर्चा करणे, हे चुकीचे असल्याचे प्रवीण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी चर्चा करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. भाजप मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भात जाणीवपूर्व कोणत्याही प्रकारची आडकाठ करत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाशी प्रवीण दरेकर यांनी सहमती दर्शवली आहे.

सध्या महाराष्ट्र कोरोनाचा वाढता संसर्ग आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्र पद या विद्वधा अवस्थेत महाराष्ट्र सापडली असून राज्यपालींनी लवकर हा प्रश्न सोडवतील का?, याप्रश्वावर विचारल्यावर प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या घटनात्मक गोष्टी तपासणारी यंत्रणा आहे. यामुळे माझ्या सारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांना काही सांगण्याचा विषय येत नाही. आम्ही सांगण्यावरून राज्यपाल निर्णय घेत नाही, असे म्हणत त्यांनी राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला वेळ घेत असलेल्या प्रश्नांना प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना बगल दिली आहे. राज्यपाल हे योग्य आणि न्याय भूमिका ते निश्चितपणे घेतली. राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही, या गोष्टी फक्त राज्यपालच देऊ शकतात. एकदमच काही होणार नाही, अशी मानसिकता ठेवण्याचे काही कारण नाही, अजून बरेच दिवस आहेत, असेही प्रविण दरेकर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

प्रविण दरेकर यांची संपूर्ण मुलाखत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांची केली पाठराखण, तर खडसेंच्या सहकार्याची आम्हाला गरज !

News Desk

औरंगाबाद जिल्ह्यात १, ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा, बाळासाहेब थोरातांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk