HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीला, जनता पळ काढायला लावेल; प्रवीण दरकेरांचा सरकारवर निशाणा

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नेहमीच महाविकासआघाडीवर टीका करत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकासआघाडी मध्ये सुरु असलेल्या कुरघोड्यांवर अनेक राजकारणी आपलं मत मांडत आहेत. सरकाच्या नाकर्तेपणामुळे जनतेच्या बाहुत बळ राहिले नाही. अश्याच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारला जनतेचं काही पडलेलं नाही

महाविकासआघाडी सध्या त्यांच्यातला तिढा सोडवण्यात व्यस्था आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दरेकर यांनी म्हटलं आहे. काँग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला. महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतकऱ्यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही’, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता

राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहील याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे, असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिद्दीने यशस्वी होण्याचे आवाहन;बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

News Desk

निसर्ग चक्रीवादळामुळे २०२० मधील सर्वात स्वच्छ हवेची नोंद बुधवारी करण्यात आली

News Desk

बेळगाव निवडणूकांवरून आता संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील आमनेसामने !

News Desk