HW News Marathi
महाराष्ट्र

“गाल सर्वांनाच रंगवता येतात”, प्रवीण दरेकरांचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

पुणे | भाजप आमदार प्रवीण दरेकर त्यांच्या एका वक्तव्यवरून चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते दरेकर?

शिरुर मधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी केली. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाहीय. सुभेदार,कारखानदार,बँका,आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा आरोप केला आहे.

सर्व गोष्टीला हे नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार

राज्यात महिलांवर अत्याचार,बलात्कार,विनयभंग होतात अन पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार,बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला हे नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असल्याचं दरेकर म्हणाले. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर सरकारचा अंकुश नाही. अत्याचाराच्या घटना थांबवणं हा सरकारचा प्राधान्यक्रम दिसत नाही यांना फक्त सत्ता टिकवायची आहे असं दरेकर म्हणाले आहेत.

थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाचे भाषेचा वापर वाद निर्माण झाला.’गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. यावरच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ‘दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट करत प्रवीण दरेकर यांना इशारा दिलेला आहे.

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान, या सगळ्या वादाविषयी प्रविण दरेकर यांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला

रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्य नंतर आता प्रवीण दरेकरांनी त्यांचं मत मांडलं आहे. मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात, कुणीही अतिरेकी भाषा करु नये. ती मराठीत म्हण आहे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. राष्ट्रवादी पक्ष हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो. उमाजी नाईक यांच्या जयंतीला लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित झाले. त्यांच्यावर कारवाई झाली ती योग्य म्हणता येणार नाही. मात्र गर्दी केल्याबाबत हीच कारवाई राष्ट्रवादीच्या मेळाव्यावर, शिवसेनेच्या आंदोलनावर का नाही, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही”- मुख्यमंत्री

News Desk

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk

रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला!

News Desk