HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरे यांच्या मताशी सहमत!”, प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना पाठिंबा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या वादावादीचं वातावरण निर्माण होत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात जातीवाद वाढला आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे

प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं आहे”, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी पुण्यात काल(२० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “मी प्रबोधनकार ठाकरे जसे वाचलेत तसे यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती जातीमधे द्वेष निर्माण होत गेला. जातीपातीचे राजकारण आधीही होत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून द्वेष निर्माण करण्यासाठी राजकारण करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता कधीतरी विकासाच्या मुद्यावर मत देईल ही अपेक्षा. प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणातील हवे तेवढेच घ्यायचे असं केलं जातय. यशवंतराव चव्हाणांची विचार करण्याची प्रक्रिया कशी होती हे देखील मला ठावूक आहे. मी शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलाखत घेतली होती तेव्हा मुलाखती आधी म्हटलं होतं की काही गोष्टी आज राखून ठेवाव्या लागतील. कारण वाढदिवसाच्या दिवशी चांगलं बोलायच असतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अखेर पुणे शहरातल्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा’, दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत असतील सुरू!

News Desk

कोल्हापूर जिल्हा पाच दिवसांपासून पाण्याखाली

News Desk

“या वर्षी परीक्षा होणारच”, वर्षा गायकवाडांनी ठणकावून सांगितले

News Desk