HW News Marathi
महाराष्ट्र

आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- प्रविण दरेकर

पालघर। मोखाड्या तालुक्यातील आत्महत्या प्रकरणात आता आमदार प्रवीण दरेकर यांनी मध्यस्त केली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्या, अशा सूचना दरेकर यांना उपस्थित प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तर या योजनांचा काय फायदा?

आदिवासी महिलेला अद्यापही घर मिळालेले नाही. घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेमधूनही या आदिवासी महिलेला घर मिळत नसेल तर या योजनांचा काय फायदा? असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, ठाणेपासून काही तासाच्या अंतरावरील आदिवासी गावातील हे विदारक चित्र पाहावयास मिळाले. या दुरावस्थेला येथील शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. या आदिवासी महिलेप्रमाणे आज अनेक आदिवासी महिला घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या आहेत, असं दरेकर म्हणाले आहेत.

आदिवासींसाठी काम करण्याची आवश्यकता आहे

दरेकर म्हणाले की, या आदिवासींसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहितीही कोणत्याही यंत्रणेने घेतलेली दिसत नाही. कफनासाठी 500 रु मागितले. पण त्या आदिवासीला गडी म्हणून ठेवले व त्याने आत्महत्या केली हे गंभीर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हा विषय नक्कीच धसास लावल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना

निष्पाप आदिवासी व कातकरी बांधवांवर अन्याय होत असेल तर हे गंभीर आहे. सरकार म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रांत अधिकारी यांना सूचना देऊन त्या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून देण्याच्या सूचना उपस्थित शासकीय यंत्रणेला दरेकर यांनी दिल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस संपले – शाहू छत्रपती

News Desk

“…राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय”, शरद पवारांची मिश्किल टीका

Aprna