HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली,भाजप नेत्याचा आरोप!

मुंबई | “शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवडून आल्या आणि आमचे सरकार आले, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केले” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत म्हटले. तसेच, त्यांचा पायगुण चांगला होता असेही ते म्हणाले. त्यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.

“अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचे काय झाले?” असा टोला दरेकर यांनी अजित पवारांना लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, “त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली” ही खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.त्यामुळे भाजपने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत एक नवी रंगत वाढली होती, मात्र, भाजपने निवडणुकींवर बहिष्कार टाकला आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ विधिमंडळाचं २ दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आलं आहे. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा म्हणजेच अखेरचा दिवस आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पार पडणार होती. भाजपा आणि शिवसेना यांच्यात ही निवडणूक रंगणार असली तरी यापूर्वीच भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही निवडणूक सद्यस्थितीत होऊ नये यासाठी भाजपानं न्यायालयात धाव घेतली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉकडाऊनचा पुनर्विचार करा अन्यथा…”, उदयनराजेंचा गंभीर इशारा!

News Desk

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? – नाना पटोले

Aprna

कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपचे कटकारस्थान – नवाब मलिक

News Desk