मुंबई | कोरोनामुळे गेली दीड वर्ष शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांना घरी बसण्याची वेळ आली आणि त्यामुळे विनाअनुदानित शाळांमधीलशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रवीण दरेकरांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून मुख्यमंत्र्यांना लिहिलेला पत्र शेअर केलं आहे. या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे कि कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, असे म्हटले आहे. हे पत्र प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी आणखी काही मुद्दे पत्रात मांडले आहे.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी @CMOMaharashtra मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/h8x7gVNOZW
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 21, 2021
एसटी कर्मचाऱ्यांना मदत
प्रवीण दरेकर यांनी अजून एक पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिला आहे, ज्यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.
कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. @CMOMaharashtra @advanilparab एसटी कर्मचा-यांना न्याय मिळवून द्या!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 21, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.