HW News Marathi
महाराष्ट्र

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळणार!

सातारा। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करणाऱ्या प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

प्रवीण जाधवचा सत्कार

भारताचं नाव रोशन करणाऱ्या प्रवीण जाधवचा सत्कार करण्यात आला. फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ” लक्ष्मी – विलास पॅलेस ” या निवासस्थानी प्रवीण जाधव यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण तालुका व सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जाहिर सत्कार करण्याचे नियोजन करणार आहे. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी प्रवीण जाधव यांचा सत्कार व सन्मान आगामी काळामध्ये करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यामध्ये मुले व मुलींचे हॉकी, कबड्डी या खेळांसह विविध खेळांमध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षण मिळण्यासाठी फलटण येथे प्रशिक्षण केंद्र व उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देणार आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

फलटण तालुक्यातील सरडे येथील प्रवीण जाधव याने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये आर्चरी हा खेळ खेळून मेडल पर्यंत मजल मारली. प्रवीण जाधव यांची पहिली वेळ असल्याने त्यांना या वेळी अपयश आले. पुढच्या होणाऱ्या ऑलम्पिक साठी प्रवीण जाधव यांना आंतरराष्टीय दर्जाचे ट्रेनिंग देवून प्रवीण हे पुढच्या ऑलम्पिक मध्ये पदक मिळवतील, ही खात्री आपल्या सगळ्यांना आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केले आहे.

प्रवीण जाधवची कमल कामगिरी

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी ३२ जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्या अजून किमान दोन विजय आवश्यक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपल्या मालकाला खूश करण्यासाठी हे करतात”, आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात…!

News Desk

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली

swarit

जिम, रेस्टॉरंट सुरू करण्याची आता रोहित पवारांचीही मागणी!

News Desk