HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुण्याच्या ‘आयएनएस शिवाजी’ संस्थेचा होणार सन्मान

Ramnath Kovind

पुणे | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे काल (१२ फेब्रुवारी) वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. नौदल अभियांत्रिकी प्रशिक्षण सेवेत महत्त्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस शिवाजी या संस्थेला राष्ट्पती ध्वज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हाच पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पत्नी सविता कोविंद यांच्या समवेत पुण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, परिवहन तथा सांसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, महापौर मुरलीधर मोहोळ, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

आयएनएस शिवाजी या संस्थेला १५ फेब्रुवारीला ७५ वर्ष पुर्ण होणार आहेत. या ७५ वर्षांत संस्थेतून २ लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, मित्रराष्ट्रांच्या नौदलाचे अधिकारी, तसेच इतर दलांतील सैन्य अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम ‘आयएनएस शिवाजी’ येथे होते.

दरम्यान, राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात. देशाच्या संरक्षण कार्यात अतुलनीय कार्य केलेल्या ४ संरक्षण क्षेत्रातील दल, संस्था किंवा संघटनेला ध्वज प्रदान केला जातो. संस्थेचे निशाण अधिकारी राष्ट्रपतींकडून हा ध्वज स्वीकारतील, अशी माहिती ‘आयएनएस शिवाजी’ प्रशासनातर्फे देण्यात आली.

Related posts

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये !

News Desk

#LokSabhaElections2019 : राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार ?

News Desk

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शंभर शाळा डिजिटल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प

News Desk