नवी दिल्ली | इंधनांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आणि विरोधक मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेले असताना आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक अजब विधान केले आहे. “हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात. आता हिवाळा संपला कि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कमी होतील”, असे विधान धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते आज (२६ फेब्रुवारी) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या या विधानामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Increase in petroleum price in international market has affected consumers too. Prices will come down a little as winter goes away. It's an international matter, price is high due to increase in demand, it happens in winter. Price will come down: Union Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/hYPqHt7b1S
— ANI (@ANI) February 26, 2021
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले कि, “आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. हिवाळा गेल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून हिवाळ्यात मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं. हिवाळा संपला कि दर कमी होतील.” दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या या वक्तव्याने आता विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.