नवी दिल्ली | राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज (२४ एप्रिल) पंतप्रधान मोदींनी देशभरातील सरपंचाशी संवाद साधला आहे. त्याचप्रमाणे याचनिमित्ताने पंतप्रधानांनी ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टलचे देखील उद्घाटन केले. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढणाऱ्या ग्राम पंचायतींचे देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी कौतुक केले. कोरोनाच्या या संकटात स्वावलंबी होऊन या संकटाशी लढण्याची आवश्यकता आहे. आपण स्वावलंबी राहिलो नाहीत तर आपल्यासाठी ही लढाई कठीण होऊन बसेल, असे देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.
Prime Minister interacts with Sarpanchs from across the nation via video conferencing, on the occasion of #PanchayatiRajDiwas. Panchayati Raj Minister Narendra Singh Tomar also present, he says, "The PM will inaugurate 2 programmes today". pic.twitter.com/4om0D4kTeN
— ANI (@ANI) April 24, 2020
कोरोनामुळे आपल्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपण त्याची कधीही कल्पना केली नव्हती. या सर्व समस्यांचा सामना करून आपल्याला हि लढाई जिंकायची आहे. अशा स्थितीत आपण स्वावलंबी असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टलबद्दल माहिती दिली. “ई-ग्राम स्वराज्यवर ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व योजनांची माहिती मिळणार असून हे मोबाईल अॅपच्या स्वरूपातही उपलब्ध असणार आहे”, अशी माहिती पंतप्रधांनी यावेळी दिली.
Prime Minister Narendra Modi inaugurates e-GramSwaraj portal and a mobile application, on the occasion of #PanchayatiRajDiwas pic.twitter.com/ADgj15Adum
— ANI (@ANI) April 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.