HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

मोदी-शहा पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी उद्या पुण्यात येणार

मुंबई | देशभरातील पोलीस महासंचालकांच्या येत्या तीन दिवसांची परिषद पुण्यात आयोजन करण्यात आली आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (६ डिसेंबर) पुण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुण्यातील विमानतळावर जाणार आहेत. ही परिषद उद्या, शुक्रवार ६ डिसेंबरपासून ते रविवार, ८ डिसेंबरपर्यंत होणार आहे. राज्यात नुकतेच महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळली आहेत. देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणे, देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे आणि पुढील वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्दिष्टे आहे.

या सगळ्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्या आधीच मोदी हे पोलीस महासंचालकांच्या बैठकीला पुण्यात येत आहेत. मोदी उद्या रात्री ९.५० च्या सुमारास पुण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उद्या पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत.

महाविकासआघाडीच्या सरकारनंतर पहिल्यांदा मोदी-शहांची भेट

मोदी आणि शहा यांची उपस्थिती ही लक्षवेधी असण्यामागचे कारण म्हणजे शहा यांनी बंद दाराआड ठाकरे यांना शिवसेनेला राज्यात त्यांचा मुख्यमंत्री अडीज वर्षांसाठी करू, असे आश्वासन दिले होते, असा दावा ठाकरेंकडून करण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे नेते खोटे बोलत असल्याचा आरोपही ठाकरेंनीकेला होती. यामुळे शिवसेना भाजपची युती तुटून दोन्ही पक्षांमध्ये खोल दरी निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेनेने एकमेव मंत्रीपदावर पाणी सोडून एनडीएतून बाहेर पडली.

Related posts

तामिळनाडूत पोलिसांच्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू

News Desk

बेळगाव सीमा भागातील लोकांच्या भावना लक्षात घ्या- आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी

News Desk

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी सात पं.स.मध्ये भाजपची सत्ता  

News Desk